प्रा .डॉ सुनीलकुमार गोरखनाथ पाटील यांना डॉक्टरेट पदवी ( Ph D) प्रदान
सिंधुदुर्ग -ऑलिम्पियाड एग्जामिनेशन कौंसिल विद्यापीठने अंबोली (सावंतवाडी , सिंधुदुर्ग) येथे आयोजित केलेल्या पदवी वितरण समारंभात पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ .सुनीलकुमार पाटील यांना गोव्याचे मा मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण ( Engineering and Technology) क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी ( Ph D) प्रदान करण्यात आली.
सदर प्रसंगी ऑलिम्पियाड एग्जामिनेशन कौंसिल चे कुलगुरू डॉ.आचार्य जगदीश सो , प्रमुख पाहुणे अरविंद परिशेट्टी ( Parushetti) , डॉ अनिलराव कुराडे , संचालिका सौ संगीता पाटील , प्राचार्य सुजित पाटील व मान्यवर उपस्थित होते. सदर प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर डॉक्टरेट पदवी मिळाल्या बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले तसेच भावी आयुष्या साठी शुभेच्या दिल्या.




