नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » देश » धार्मिक » एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांएवढे व्हावे; हनुमंतराव ताटे यांची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांएवढे व्हावे; हनुमंतराव ताटे यांची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांएवढे व्हावे; हनुमंतराव ताटे यांची मागणी

केळघर-एसटी कामगारांचे वेतन हे राज्य सरकारी कर्मचाऱ्याएव्हढे होण्यासाठी एसटी कामगार संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहे. एसटी चे सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचारी यांना मोफत पास सुरुवातीला 2 महिन्याचा पास मिळाला.कामगार संघटनेने पाठपुरावा करून सेवानिवृत्त कामगारांना पती-पत्नीला कायमस्वरूपी मोफत पास मिळवण्यात संघटनेला यश आले आहे. परंतु एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये फरक न भरता मोफत पास मिळावा यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.सध्या सेवानिवृत्त कामगारांना पेन्शन सध्या एक ते दोन हजार एवढी अल्पशा प्रमाणात मिळते त्यासाठी केंद्र पातळीवर सेंट्रल ट्रेड युनियन आणि इतर चळवळींसोबत मिळून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

लिपिक पदोन्नती साठी पात्र-अपात्र दोघांनाही एकत्र न्याय मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहे.सातारा विभागातील सेवा जेष्ठतेवरती लवकरच तोडगा निघेल.महागाई भत्ता, रेट ऑफ इन्क्रिमेंट 2018 पासूनचा प्रलंबित आहे. कराराप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळाला पाहिजे, ही संघटनेची भूमिका स्पष्ट आहे..

ST कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांएवढे झालेच पाहिजे.

महाराष्ट्रात सर्वत्र गाड्यांची कमतरता असून 50% महिला आरक्षण, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, पण त्या प्रमाणात नव्या गाड्या नाहीत,काम वाढलं पण कामगार नाहीत. रेगुलर भरती जाहिरात देऊन झाली पाहिजे.अनेक कर्मचारी TTS म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहेत परंतु त्यांना समय वेतनश्रेणी वरती घेण्यात यावे याचा पाठपुरावा संघटनेकडून चालू आहे याला लवकरच यश येईलअशी ग्वाही एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत राव ताटे यांनी दिली..महाबळेश्वर आगारात वाहतूक नियंत्रक बबनराव दुदुसकर व सातारा विभागातील विभागीय कार्यालयातील वाहतूक नियंत्रक आसिफ मुजावर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त महाबळेश्वर आगार कामगार संघटनेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ताटे बोलत होते.

यावेळी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख,कामगार संघटना विभागीय सचिव प्रकाश पाटील, आगार व्यवस्थापक महेश जाधव, माजी आगार व्यवस्थापक नंदकुमार चोरगे, श्री. फकीर, कामगार संघटनेचे विभागीय पदाधिकारी ज्ञानेश्वर घोणे, अजित पिसाळ, सुशांत मोहिते, महेंद्र साळुंखे, लाडुताई मडके, जनक जाधव, मोहन कणसे, सहायक वाहतूक अधीक्षक प्राजक्ता मोहिते, वाहतूक निरीक्षक शाहरुख खान, सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ, कामगार संघटना महाबळेश्वर आगार सचिव संतोष सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळ म्हणाले, .बबन दुदुसकर व आसिफ मुजावर यांनी कामगार संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. कामगारांच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कामगार संघटना राज्य पातळीवर पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.या सत्कार सोहळ्या दरम्यान महाबळेश्वर आगार सचिव संतोष सावंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रारंभी हनुमंतराव ताटे यांच्या हस्ते बबनराव दुदुसकर व आसिफ मुजावर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

या सेवानिवृत्त सोहळ्यास रा.प.वरिष्ठ अधिकारी, सहकारी, मित्रमंडळी नातेवाईक, सातारा विभागातील सर्व आगार अध्यक्ष/सचिव, पदाधिकारी सभासद उपस्थित होते.चंद्रकांत वळकुंदे (मा. वाहतूक नियंत्रक)यांनी सूत्रसंचालन केले.संतोष सावंत यांनी आभार मानले.कामगार संघटना महाबळेश्वर आगार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket