अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » सवादे येथे अनोखा पायंडा ! विजयी उमेदवारांसह पराभूत लढवय्यांचाही शाही सत्कार मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती; उदयसिंह दादांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

सवादे येथे अनोखा पायंडा ! विजयी उमेदवारांसह पराभूत लढवय्यांचाही शाही सत्कार मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती; उदयसिंह दादांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

सवादे येथे अनोखा पायंडा ! विजयी उमेदवारांसह पराभूत लढवय्यांचाही शाही सत्कार मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती; उदयसिंह दादांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

कराड प्रतिनिधी –निवडणुकीत जय-पराजयाच्या पलीकडे जाऊन लोकशाहीचा उत्सव साजरा करत कराड तालुक्यातील सवादे येथे एक आगळावेगळा सोहळा पार पडला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यासोबतच, चुरशीची लढत देणाऱ्या पराभूत उमेदवारांचाही सन्मान करून सवादेकरांनी राजकीय सुजाणतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यकर्ता मेळावा आणि सत्कार सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यात विजयी उमेदवार नितीन थोरात, सौ. विजया थोरात, सौ. वृषाली पाटील, सौ. स्वाती थोरात आणि सौ. पूजा काटवटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, निवडणुकीत अल्प मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या मात्र पक्षासाठी आणि जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या उमेदवारांचाही तितक्याच मानाने गौरव करण्यात आला. मंत्री मकरंद पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील (दादा) यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरात जोरदार कौतुक होत आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, रयत संघटनेचे कार्यकर्ते, विविध गावांतील नागरिक आणि समर्थकांची अलोट गर्दी झाली होती. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या सोहळ्याला एका मोठ्या सणाचे स्वरूप आले होते.

दरम्यान, “प्रत्येक राजकीय पक्ष विजयी उमेदवारांचे कौतुक करतो; मात्र पराभूत उमेदवारांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. निवडणूक ही लोकशाहीची केवळ एक प्रक्रिया आहे. पराभूत उमेदवारांनी जनतेसाठी केलेले कार्यही तितकेच महत्त्वाचे असते. हा सकारात्मक पायंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर राबविण्याचा प्रयत्न करेल.” असा विश्वास यावेळी मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket