अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » स्व. प्रतापराव भोसले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला शानदार प्रारंभ

स्व. प्रतापराव भोसले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला शानदार प्रारंभ

स्व. प्रतापराव भोसले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला शानदार प्रारंभ

जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा – पर्व दुसरे यास जिल्हाभरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १६६ खेळाडूंनी सहभाग नोंदवत स्पर्धेच्या उद्घाटनालाच वाईकरांचे लक्ष वेधून घेतले.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्याचे माजी विधान परिषद सदस्य मा. श्री. उल्हासदादा पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मदन भोसले. सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा व पंचायत समिती सदस्या, , सौ. सुरभी भोसले,जेष्ठ पत्रकार मा. श्री. विजय कुवडेकर, किसनवीर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गुरुनाथ फगरे आणि सी. ए. उदयभाई गुजर, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे राज माजगावकर हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मा. श्री. मदन भोसले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, “खेळ हा केवळ जिंकणे-हरणे यापुरता मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रभावी मार्ग आहे. शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि जिद्द या गुणांची जोपासना खेळातून होते. तरुणांनी क्रीडेला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे.”

या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या आयोजनासाठी वाई जिमखान्याचे अध्यक्ष अमर कोल्हापुरे यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच स्पर्धा प्रमुख वैभव फुले यांनी स्पर्धेचे नियोजन, वेळापत्रक आणि संपूर्ण व्यवस्थापन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सांभाळले. आयोजनात अमीर बागुल आणि सायमन नडार यांनीही मोलाचे योगदान दिले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रीती कोल्हापुरे यांनी प्रभावीपणे केले. 

स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) यांनी शिक्षण, सामाजिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रात दिलेले योगदान आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा त्यांच्या कार्याला वाहिलेली एक अर्थपूर्ण आदरांजली ठरत आहे.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी विविध गटांतील सामने अत्यंत चुरशीचे झाले. सहभागी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली. जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा – पर्व दुसरे हा उपक्रम क्रीडा संस्कृतीला चालना देणारा आणि नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket