Home » ठळक बातम्या » महाबळेश्वर पंचायत समितीची मासिक सभा उत्साहात संपन्न; प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे प्रशासनाला आदेश

महाबळेश्वर पंचायत समितीची मासिक सभा उत्साहात संपन्न; प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे प्रशासनाला आदेश

महाबळेश्वर पंचायत समितीची मासिक सभा उत्साहात संपन्न; प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे प्रशासनाला आदेश

महाबळेश्वर||पंचायत समिती महाबळेश्वरची मासिक सर्वसाधारण सभा आज बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी के.एम.आर. भिल्लारे सभागृहात सभापती मा. सौ. शकुंतला रमेश चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेमध्ये तालुक्यातील विकासकामे, पाणीटंचाई आणि विविध शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रमुख उपस्थिती

या सभेला उपसभापती मा. श्री. संजय मोरे, पंचायत समिती सदस्य श्री. संजय विठ्ठल शेलार, सौ. वंदना प्रवीण भिलारे, जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय केळगणे, श्री. अजित संकपाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी (सातारा जि.प.) श्री. राहुल कदम आणि गट विकास अधिकारी श्री. विजय विभुते यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला गट विकास अधिकारी विजय विभुते यांनी सर्वांचे स्वागत केले.

सभेतील प्रमुख निर्णयांचे मुद्दे:

१. पाणीपुरवठा व टंचाई निवारण:

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची गावनिहाय माहिती दिली. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही सुरू असून, प्रत्येक गावाची परिस्थिती पाहून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

२. बांधकाम विभाग व जनसुविधा:

जनसुविधा, यात्रास्थळ विकास आणि पंचायत समिती सेस अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. जे ठेकेदार (मक्तेदार) कामात दिरंगाई करत आहेत, त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन अडचणी समजून घेण्याचे आणि कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

३. शिक्षण आणि आरोग्य:

शिक्षण:शाळा खोल्यांची दुरुस्ती, नवीन बांधकामे आणि रिक्त पदे भरण्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि दिव्यांगांना भत्ता वाटप यावर भर देण्यात आला.

 आरोग्य:आरोग्य निर्देशांकात (इंडिकेटर) मागे असलेल्या विभागांनी कामगिरी सुधारण्याचे आदेश दिले. तसेच सर्पदंश आणि श्वानदंश लसींचा पुरेसा साठा केंद्रांवर उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

४. कृषी व पशुसंवर्धन:

कृषी विभागाने बियाणे आणि खत पुरवठा वेळेत करण्याचे नियोजन केले आहे. पशुसंवर्धन विभागाने चारा टंचाईबाबत योग्य नियोजन करावे आणि जनावरांच्या लसीकरणाबाबत जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

५. आर्थिक शिस्त आणि नियोजन:

जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पंचायत समितीला प्राप्त झालेला

१ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी* वेळेत आणि नियमानुसार खर्च होणे आवश्यक आहे. व्हीपीडीए (VPDA) प्रणालीचा वापर आणि जीएसटी/इन्कम टॅक्स बाबतचे कामकाज चोख ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रशासनाला कडक सूचना

गट विकास अधिकारी श्री. विजय विभुते यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बजावले की, लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचे पालन करून जनतेची कामे विनाविलंब पूर्ण करावीत. सभापती सौ. शकुंतला चोरमले आणि इतर सदस्यांनीही “जनतेच्या हिताला प्रथम प्राधान्य द्या” असा सूर आळवला.

सभेचे कामकाज कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. प्रभाकर शेंडे, श्री. दिनकर जाधव आणि श्री. श्रीकांत धनवडे यांनी पाहिले. शेवटी श्री. प्रभाकर शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपन्न झाली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket