पाटखळ येथे आयशर ट्रक कालव्यात कोसळला; चालक व क्लिनर बचावले
सातारा -कण्हेर डावा तीर कालव्यामध्ये आज पहाटे पाटखळ गावच्या हद्दीत आयशर ट्रक घसरून पडल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात चालक व क्लिनर सुरक्षित बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून कण्हेर व उरमोडी धरणातून होणारा पाणी विसर्ग तात्पुरता बंद केला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रक कालव्याबाहेर काढण्यात आला.
वाहन बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होताच दोन्ही धरणातून पाणी विसर्ग पूर्ववत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती.




