अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा वन विभागाचा मान उंचावला; राजाराम काशीद यांना मंत्र्यांचे अभिनंदन

सातारा वन विभागाचा मान उंचावला; राजाराम काशीद यांना मंत्र्यांचे अभिनंदन

सातारा वन विभागाचा मान उंचावला; राजाराम काशीद यांना मंत्र्यांचे अभिनंदन

वनपाल राजाराम काशीद यांच्या अभ्यासपूर्ण कामाचे मंत्री गणेश नाईक यांनी केले कौतुक

सातारा : सातारा वन विभागातील वनपाल राजाराम सुभाष काशीद यांच्या उल्लेखनीय कार्याची राज्य शासनाने दखल घेतली असून, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांना विशेष कौतुकपत्र देऊन सन्मानित केले आहे.

काशीद यांनी तयार केलेल्या निसर्गक्षेत्र पुस्तिका (बीट बुक) व परिसंस्था पुस्तिका (राऊंड बुक) यामध्ये वनक्षेत्राची सविस्तर माहिती, जैवविविधता, मानव-वन्यजीव संघर्ष, गावांची माहिती तसेच ‘कास पठार’ सारख्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाची माहिती अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने संकलित करण्यात आली आहे.

वनमंत्री गणेश नाईक यांनी पत्राद्वारे काशीद यांच्या समर्पण भावनेचे, अभ्यासू वृत्तीचे आणि उत्कृष्ट नोंद कार्याचे कौतुक केले. तसेच अशा दक्ष वनपालांमुळे राज्यातील वनक्षेत्र सुरक्षित राहून त्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे नमूद केले.

यासोबतच भविष्यातही आपण असेच उत्कृष्ट कार्य करत राहाल, असा विश्वास व्यक्त करत विभाग आपल्या पाठीशी कायम राहील, अशी ग्वाहीही मंत्र्यांनी दिली.वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये या सन्मानामुळे आनंदाचे वातावरण असून, राजाराम काशीद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket