अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » पार्वतीपूर पार येथे दिमाखदार पालखी सोहळ्याने श्रीराम वरदायिनी मातेच्या यात्रेस प्रारंभ

पार्वतीपूर पार येथे दिमाखदार पालखी सोहळ्याने श्रीराम वरदायिनी मातेच्या यात्रेस प्रारंभ

पार्वतीपूर पार येथे दिमाखदार पालखी सोहळ्याने श्रीराम वरदायिनी मातेच्या यात्रेस प्रारंभ

महाबळेश्वर:ऐतिहासिक महत्व लाभलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथिल श्रीराम वरदायिनी मातेच्या वार्षिक यात्रौत्सवास मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली.सकाळी श्रीराम वरदायिनी देवी तसेच मंदिर परिसरातील इतर देव देवतांना जलाभिषेक करण्यात आला.

श्रीराम वरदायिनी मातेच्या मुळ स्थान मेट येथिल मंदिराती मुर्तीस जलाभिषेक करण्यात आला.सायंकाळी ४ वा.मंदिरात सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.तर सायंकाळी ५ वा. नंतर देवीची पालखी मिरवणुकीस पारंपारीक वाद्यांच्या गजरात आणि शिव हर,हर,महादेव श्रीराम वरदायिनी आचं चांगं भलं च्या जयघोषात आणि फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक पार पङली.

यावेळी गावात पालखी सोहळ्याच्या वेळी महिला वर्गाने पालखीच्या स्वागता साठी संध्याकाळच्या वेळेस प्रत्येकांच्या घरांच्या अंगणात सङा,सारवन करुन काढलेल्या आकर्षक रांगोळ्यानी आणि पालखी मार्गाच्या दुतर्फा दिवे लावुन आपला आनंद साजरा केला.यावेळी संपूर्ण गाव दिव्यांच्या प्रकाशाने ऊजळुन निघाले होते.अबालवृध्दांचा आनंद ओसंङुन वाहत होता.

पालखी मिरवणूकी नंतर पालखी मंदीरात येताच सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आईच्या सासन काठीच्या उभारणीचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन देखिल करण्यात आले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket