अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कराड येथील कोयना वसाहतीत हिट अॅण्ड रन एक महिला ठार; तीन-चारजणी जखमी, जखमींवर उपचार सुरू

कराड येथील कोयना वसाहतीत हिट अॅण्ड रन एक महिला ठार; तीन-चारजणी जखमी, जखमींवर उपचार सुरू

कराड येथील कोयना वसाहतीत हिट अॅण्ड रन एक महिला ठार; तीन-चारजणी जखमी, जखमींवर उपचार सुरू

कराड प्रतिनिधी –कोयना वसाहत, ता. कराड येथील भाजी मंडईत एका भरधाव कारने भाजी विक्रेत्या महिलांना चिरडले. त्यानंतर सदरची कार कठड्यावर जाऊन अडकली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, अन्य तीन-चार भाजी विक्रेत्या महिला जखमी झाल्या असून, त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. उषा बाळू रौंदाळे (वय ४७) रा. मलकापूर, ता. कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोयना वसाहत येथे रस्त्यालगत भरत असलेल्या भाजी मंडईत बुधवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्या कारने भाजी विक्रीसाठी बसलेल्या महिलेला चिरडले. त्यानंतर सदरची कार रस्त्यालगत असणाऱ्या बोर्डला धडकून कठड्यावर जाऊन अडकली.

दरम्यान, जखमी झालेल्या भाजी विक्रेत्या महिलेला स्थानिकांनी तात्काळ उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलवले. परंतु, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या अपघातात अन्य तीन चार भाजी विक्रेत्या महिलाही जखमी झाल्या असून, त्यांच्यावर कृष्णा रुग्णालय उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात दाखल झाली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket