सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रामनवमी निमित्त धुमाळवाडीत रक्तदानाचा महाउत्सव; 80 तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

रामनवमी निमित्त धुमाळवाडीत रक्तदानाचा महाउत्सव; 80 तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

रामनवमी निमित्त धुमाळवाडीत रक्तदानाचा महाउत्सव; 80 तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

फलटण प्रतिनिधी -धुमळवाडी येथे रामनवमीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह या धार्मिक कार्यक्रमाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फळाचे गाव म्हणून घोषित झालेल्या धुमाळवाडी, चिंचेचा मळा , येथील अमरज्योत कला व क्रीडा तरुण मंडळ ,तालुका फलटण येथील तरुण फळ उत्पादक शेतकरी युवकांनी तसेच फलटण मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामनाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

सदर रक्तदान शिबिरामध्ये 80 तरुण फळ उत्पादक शेतकऱ्यांनी रक्तदान केले, रामनवमी पासून सुरुवात होणाऱ्या व हनुमान जयंती पर्यंत सुरू असणाऱ्या हरिनाम सप्ताहामध्ये विविध मान्यवरांची प्रवचने तसेच कीर्तने तसेच जागर हरिपाठ यासह विविध धार्मिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,.

राम नवमी निमित्ताने आयोजित सप्ताह सोहळ्यामध्ये सतीश महाराज आवटे यांचे राम जन्म काळाचे कीर्तन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket