वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्हा युवक संघटकपदी आयु.शुभम बल्लाळ यांची निवड
सातारा : वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्हा पश्चिमच्या वतीने युवक संघटन मजबूत करण्यासाठी आयु. शुभम जयंत बल्लाळ यांची जिल्हा युवक संघटकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही निवड जाहीर करण्यात आली.
या वेळी सातारा जिल्हाध्यक्ष आडवोकेट दयानंद माने, जिल्हा महासचिव निलेश लाड, जिल्हाध्यक्ष युवक अमोल गंगावणे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभम बल्लाळ यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
शुभम बल्लाळ यांच्या निवडीबद्दल उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संघटना बळकट करण्यासाठी आणि युवकांना संघटित करण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.




