महाबळेश्वरात अंबरग्रीस ( व्हेल माशाची उलटी) तस्करी प्रकरणी सातारा वनविभागाची मोठी कारवाई; ५.३०० किलो अंबरग्रीससह सात जण ताब्यात
महाबळेश्वर-महाबळेश्वर परिसरात अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) तस्करी प्रकरणी सातारा वनविभागाने मोठी कारवाई करत ५.३०० किलो अंबरग्रीस जप्त केले असून सात जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ५ मार्च रोजी गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.
सहा. वनसंरक्षक (वनीकरण) सातारा यांना अंबरग्रीसची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर (प्रा.) व वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा यांच्या पथकाने महाबळेश्वर येथील वेण्णालेक व मेटतळे परिसरात सापळा रचला.
संशयित आरोपी घटनास्थळी आल्यावर अचानक धाड टाकून Ertiga (MH-43-BK-9863), Swift (MH-04-FR-0430) आणि TATA Nexon (MH-07-AG-6008) या तीन वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ५.३०० किलो अंबरग्रीस व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये
अतुल अशोक विश्वासराव (रा. ठाणे पश्चिम)
आकाश श्यामसुंदर धुरी (रा. मालवण)
एवझन क्लेमेंट फर्नांडिस (रा. मालवण)
हितेंद्र मनोहर शेट्ये (रा. लालबाग, परळ)
कौस्तुभ मिलिंद प्रभू (रा. धनकवडी, पुणे)
मोहन हरिभाऊ पाटील (रा. भावेघर, ठाणे)
विल्सन झुजे फर्नांडिस (रा. मालवण)
यांचा समावेश आहे.
या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर (प्रा.) यांनी वनगुन्हा क्रमांक वप्रा-०१/२०२६ नोंदवून आरोपींविरुद्ध Wildlife Protection Act, १९७२ च्या कलम २, ९, ३९, ४४, ४८अ व ५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अंबरग्रीस हे Sperm Whale (Physeter microcephalus) या संरक्षित समुद्री सस्तन प्राण्याशी संबंधित असून ते वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची-१ मध्ये समाविष्ट आहे. त्याची खरेदी-विक्री, साठवणूक, वाहतूक अथवा व्यापार करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. दोषी आढळल्यास ७ वर्षांपर्यंत कारावास व पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
या तस्करी प्रकरणात इतर आरोपींचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास सुरू असून वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर (प्रा.) श्री. महादेव मोहिते हे तपास करीत आहेत.
ही कारवाई उपवनसंरक्षक सातारा श्री. अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनविभागाने नागरिकांना अशा वनगुन्ह्यांमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.
महाबळेश्वरात अंबरग्रीस ( व्हेल माशाची उलटी) तस्करी प्रकरणी सातारा वनविभागाची मोठी कारवाई; ५.३०० किलो अंबरग्रीससह सात जण ताब्यात
महाबळेश्वर | दि. ०५ मार्च २०२६
महाबळेश्वर परिसरात अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) तस्करी प्रकरणी सातारा वनविभागाने मोठी कारवाई करत ५.३०० किलो अंबरग्रीस जप्त केले असून सात जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ५ मार्च रोजी गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.