Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष विमलताई पार्टे यांना ‘सातारा प्राईड 2026’ पुरस्कार जाहीर

महाबळेश्वर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष  विमलताई पार्टे यांना ‘सातारा प्राईड 2026’ पुरस्कार जाहीर

महाबळेश्वर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष  विमलताई पार्टे यांना ‘सातारा प्राईड 2026’ पुरस्कार जाहीर

महाबळेश्वर – समाजकारणाचा दृढ वसा लाभलेल्या महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका विमल पांडुरंग पार्टे यांना यावर्षीचा ‘सातारा प्राईड 2026’ हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी यंदा त्यांची निवड करण्यात आली आहे.

महाबळेश्वरच्या राजकारणात स्वर्गीय आदरणीय पी.डी. पार्टे साहेबांचा राजकीय व सामाजिक वारसा विमलताई यांनी समर्थपणे पुढे नेला आहे. महाबळेश्वरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात पार्टे घराण्याचे योगदान अमूल्य मानले जाते. राजकारणाबरोबरच समाजकारणाला प्राधान्य देत जनसेवा आणि जनहिताची कामे हेच ध्येय ठेवून त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.

नगराध्यक्ष तसेच नगरसेविका या कालावधीत विमलताई पार्टे यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले. शहराच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत प्रभावी निर्णय घेत विकासाला गती दिली. त्यांच्या कार्यामुळे महाबळेश्वरच्या विकासात लक्षणीय भर पडली आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेत सातारा न्यूज मीडिया सेव्हन तर्फे दिला जाणारा ‘सातारा प्राईड 2026’ हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून महाबळेश्वर शहरासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत रहिमतपुर पोलीस ठाणे

Live Cricket