Home » देश » दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण: केजरीवाल, सिसोदियांची निर्दोष मुक्तता; “मी भ्रष्ट नाही” म्हणताना केजरीवालांना अश्रू अनावर!

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण: केजरीवाल, सिसोदियांची निर्दोष मुक्तता; “मी भ्रष्ट नाही” म्हणताना केजरीवालांना अश्रू अनावर!

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण: केजरीवाल, सिसोदियांची निर्दोष मुक्तता; “मी भ्रष्ट नाही” म्हणताना केजरीवालांना अश्रू अनावर!

दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची राऊज एव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यामुळे केजरीवाल आणि सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. “सत्याचा विजय झाला आहे, केजरीवाल, सिसोदिया भ्रष्टाचारी नाहीत, इमानदार आहेत”, अशा शब्दात केजरीवाल यांनी निकालाचे स्वागत केले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

“सत्याचा विजय झाला. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सर्वात मोठा राजकीय कट रचला, आम आदमी पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकले. भारतातच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला तुरुंगात ठेवण्यात आले. सिसोदियांना दोन वर्षे तुरुंगात ठेवले. केजरीवाल भ्रष्टाचारी आहेत असा आरोप करण्यात, पण मी भ्रष्टाचारी नाही”, असे म्हणताना केजरीवालांना अश्रू अनावर झाले.

“केजरीवाल भ्रष्ट आहेत म्हणत आमच्यावर टीका करण्यात आली. पण, केजरीवाल भ्रष्टाचारी नाही. सिसोदिया भ्रष्टाचारी नाही. माझ्यावर खोटी केस करण्यात आली. सत्तेसाठी देश आणि संविधानासोबत असा व्यवहार करु नका. खोटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा चांगली कामं करुन सत्तेत या”, असे केजरीवाल माध्यमांशी बोलताना म्हणाले.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातील सर्व २३ आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले. यात कुलदीप सिंग, नरेंद्र सिंग, विजय नायर, अभिषेक बोईनपल्ली, अरुण पिल्लई, मुथा गौतम, समीर महेंद्रू, मनीष सिसोदिया, अमनदीप सिंग धल्ल, अर्जुन पांडे, बुच्चीबाबू गोरंटला, राजेश जोशी, दामोदर प्रसाद शर्मा, प्रिन्स कुमार, अरविंद कुमार सिंग, चरणप्रीत सिंग, के. कविता, अरविंद केजरीवाल, दुर्गेश पाठक, अमित अरोरा, विनोद चौहान, आशिष चंद माथूर आणि सरथ रेड्डी

२०२२ मध्ये दिल्ली मद्य धोरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप तत्कालिन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात करण्यात आला होता. १०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीआयकडून याबाबत विविध पुरवणी आरोपपत्रही दाखल केली होती. अरविंद केजरीवाल यांच्यासह २३ जणांची नावे आरोपपत्रात नमूद करण्यात आली होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जोसेफ विजय फ्लोअर टेस्टमध्येही पास!

जोसेफ विजय फ्लोअर टेस्टमध्येही पास! तमिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकले तमिळनाडू विधानसभेत बुधवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान तमिळगा वेत्री कळघम 

Live Cricket