Home » देश » उंब्रज येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश

उंब्रज येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश 

उंब्रज येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश 

उंब्रज परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा 

उंब्रज –उंब्रज आणि आसपासच्या ग्रामीण भागासाठी महत्त्वाची घोषणा कराड उत्तरचे आ मनोज घोरपडे यांनी केलेल्या मागणीनुसार मंगळवार दि.१० रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. उंब्रज येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

        उंब्रज परिसरातील नागरिकांना आतापर्यंत विविध महसूल कामांसाठी तालुका मुख्यालय गाठावे लागत होते. जात, उत्पन्न व रहिवासी दाखले, वारसा नोंदी, फेरफार, जमीन नोंदणी, जमीन संपादनाशी संबंधित प्रकरणे तसेच इतर महसूल विषयक कामांसाठी नागरिकांची मोठी धावपळ होत होती. वाढती लोकसंख्या, विस्तारित भौगोलिक क्षेत्र आणि विद्यमान तहसील कार्यालयांवरील वाढता कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्यानंतर प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याला गती मिळणार असून नागरिकांना सेवा अधिक जलद आणि सुलभपणे उपलब्ध होणार आहेत. विशेषतः दुर्गम भागातील शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. प्रवासाचा वेळ व खर्च वाचणार असल्याने स्थानिक पातळीवर प्रशासनाविषयीचा विश्वासही अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उंब्रज व परिसरातील नागरिकांच्या कडून राज्य शासन व आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यावरती अभिनंदनचा वर्ष होत आहे.

   प्रशासकीय सेवा जलद मिळणार 

गेली अनेक वर्षे मागणी असलेला परंतु राजकीय अनास्थेमुळे प्रलंबित पडलेला उंब्रज अप्पर तहसीलला मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे उंब्रजच्या प्रशासकीय व विकासात्मक प्रवासाला नवे बळ मिळणार असून स्थानिक पातळीवर शासन सेवा अधिक परिणामकारकपणे राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.उंब्रज सह परिसरातील नागरिकांची महसुली कामे उंब्रज येथे पार पडणार असल्याने वेळ आणि पैसा यांची बचत होणार आहे तसेच उंब्रजच्या विकासाला नवीन दिशा मिळणार आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश 

उंब्रज येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश  उंब्रज परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा  उंब्रज –उंब्रज आणि

Live Cricket