अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » उद्योजकीय तंत्र कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत. -श्रीरंग काटेकर.

उद्योजकीय तंत्र कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत. -श्रीरंग काटेकर.

उद्योजकीय तंत्र कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत. -श्रीरंग काटेकर.

गौरीशंकर एम.बी.ए. लिंब महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

-लिंब स्पर्धात्मक युगात घडणारे बदल स्वीकारून विद्यार्थ्यांनी उद्योजकीय तंत्र कौशल्य आत्मसात करावीत असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.लिंब ता. जि. सातारा येथील गौरीशंकर एम.बी.ए. महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ टीचर्स असोसिएशन व गौरीशंकर एम.बी.ए. महाविद्यालय लिंब यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ९ ते १६ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केलेल्या विद्यार्थीं विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी एम. बी. ए. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीप्ती बर्गे, डी.फार्मसी चे प्राचार्य विजय राजे, प्रा सविता मोरे आदि प्रमुख उपस्थित होते.कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. दीप्ती बर्गे म्हणाल्या ,की व्यवस्थापकीय क्षेत्रातील ज्ञान घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे कौशल्याबरोबरच, विविध बिझनेस स्किल्स ,कृत्रीम बुद्धिमत्ता (A I.), संशोधन कौशल्य, तसेच सांखिकी ज्ञान असणे गरजेचे आहे.याच हेतूने या कार्यशाळेचे आयोजन गौरीशंकर एम.बी.ए. महाविद्यालयात केले आहे. 

एक सप्ताह आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सातारा, सांगली, कोल्हापूर,पुणे यासह वीस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला आहे. उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यशाळेत डॉ. प्रवीण जाधव सेक्रेटरी शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन,कोल्हापूर व डॉ. श्वेता मेथा चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सांगली, या तज्ञांनी उद्योजकता तंत्र कौशल्य या वरती मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार प्रा सविता मोरे यांनी केले. 

केंद्र व राज्य सरकारने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे बदल केले आहेत.स्किल बेस्ड एज्युकेशन या कार्यप्रणालीचा अभ्यासक्रमात समावेश केल्याने भविष्यात विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

मदनराव जगताप, अध्यक्ष,गौरीशंकर नॉलेज सिटी, सातारा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket