भारताचा रोमहर्षक विजय, पाकिस्तानवर १ विकेटने मात, टीम इंडिया आशिया चॅम्पियन चित्रपट पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार राज्यातील सर्व ग्राहक तक्रार आयोगामध्ये ऑनलाइन सुनावणी अनिवार्य आयोगाचे कामकाज सुरू होण्यापासून संपेपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करणे कर्तव्यच – मंत्री ॲड. आशिष शेलार महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडी सुटणार; बस आगार येथील सार्वजनिक वाहनतळ प्रकल्पास परिवहन मंत्र्यांचा हिरवा कंदील निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन
Home » राज्य » प्रशासकीय » पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर, पुणे येथील विमानतळासंदर्भात आढावा बैठक पार पडली. पुणे शहर व परिसरातील वेगवान औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि गुंतवणूक आकर्षण लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुंबई येथे झालेल्या या आढावा बैठकीत त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) कालमर्यादेत भूसंपादन, निधी उपलब्धतेची ठोस पद्धत आणि सिडको, नगरविकास यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याचे आणि आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडण्याचे निर्देशही दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विमानतळ उभारणीनंतर हा परिसर ‘डेव्हलपमेंट झोन’ म्हणून विकसित होणार असून, सिडकोने आत्ताच जमीन उपलब्धतेची खात्री करावी. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची क्षमता वाढवून राज्यातील सर्व निर्माणाधीन विमानतळांचे विकासकाम या कंपनीकडे देण्यात यावे. तसेच उर्वरित भूसंपादनासाठी एमआयडीसीने अधिसूचना काढावी आणि निधी उपलब्धतेबाबतचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

सद्यस्थितीत प्रस्तावित क्षेत्रातील 1216 हेक्टर आर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण करून हरकतींचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वनपुरी, कुंभार वळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी व पारगाव या सात गावांमध्ये भूसंपादन सुरू असून, या गावांमध्ये भूसंपादनासाठी गावनिहाय उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

भारताचा रोमहर्षक विजय, पाकिस्तानवर १ विकेटने मात, टीम इंडिया आशिया चॅम्पियन

भारताचा रोमहर्षक विजय, पाकिस्तानवर १ विकेटने मात, टीम इंडिया आशिया चॅम्पियन ओमान : मोहित उल्वा याने शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ३

Live Cricket