कुसुंबी गटात शिवसेनेचा प्रचार दौरा; गावोगावी मतदारांशी संवाद
मेढा प्रतिनिधी- शिवसेनेचे 80 टक्के समाजकारण आणि केवळ 20 टक्के राजकारण हे धोरण आहे . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागातील बोंडारवाडी धरणासह , पर्यटन , कृषी व्यवसाय , महिला गृहउद्योग याला चालना देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून काम करणार आहे . त्यामुळे जनता नक्कीच माझ्या सारख्या समाजसेवकाच्या पाठीशी ठाम उभी राहील असा विश्वास शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी व्यक्त केला .
कुसुंबी जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार कविताताई ओंबळे यांच्या प्रचारार्थ केळघर परिसरातील कुरुळोशी , गाढवली , आंबेघर , डांगरेघर , पुनवडी , नांदगणे , वरोशी , बोंडारवाडी , भुतेघर , वाहिटे , बाहुळे , वाळंजवाडी , तळोशी , मुकवली , वाटंबे , गवडी , आसनी , ओखवडी , भोगवली आदि गावांमध्ये प्रचार दौरा करण्यात आला . यावेळी ते बोलत होते .यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सचिन शेलार, युवासेनेचे तालुका प्रमुख प्रसाद धनावडे , प्रशांत जुनघरे , विठ्ठल पाटणे , महादेव ओंबळे , बाळासाहेब ओंबळे , दिपक ओंबळे , वनिता ओंबळे , राजाराम जाधव आदि उपस्थित होते .
यावेळी कविताताई ओंबळे म्हणाल्या , ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे . शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ ओंबळे हे कोणताही पक्ष न बघता केवळ समाज हितासाठी काम करत आले आहेत . त्यामुळे जनता नक्कीच शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभी राहिल . यावेळी गावा -गावातील मतदारांशी संपर्क साधत पक्षाची भूमिका समजावून सांगत धनुष्य बाणाला मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले .




