थाळीप्रेमींसाठी पर्वणी : नूतनारंभ शंकरविलास थाळी भोजचा शुभारंभ
सातारा प्रतिनिधी :थाळीप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून, सातारा शहरात शंकरविलास – थाळी भोजया या नव्या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवार, १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. हा शुभारंभ सोहळा देवी चौक राजपथ, सातारा येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, नामदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य), नगराध्यक्षा अमोल मोहिते, महाराष्ट्र राज्य वाहतूक महासंघाचे अध्यक्ष श्री. प्रकाश गवळी, प्रसिद्ध डॉक्टर व सामाजिक व्यक्तिमत्त्व डॉ. अच्युत गोडबोले तसेच प्रख्यात उद्योजक श्री. बाबाशेठ तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या उपक्रमासाठी श्री. दुर्गेश पेंडुलकर (आर्किटेक्ट – इंटिरिअर कन्सल्टंट) आणि इर्शाद बागवान अँड असोसिएट्स (बिल्डर्स अँड डेव्हलपर्स) यांचे सहकार्य लाभले आहे.
घरगुती चव, शुद्धता आणि परंपरेचा वारसा जपत सुरू होत असलेले शंकरविलास थाळी भोजन हे सातारा शहरातील खाद्यप्रेमींसाठी एक नवा अनुभव ठरणार आहे. या शुभप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री.वसंत जोशी व परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.




