कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी!

उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी!

उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी!

उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघालेल्या तरुण भाविकांच्या कारचा चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला; तर चार जण गंभीर जखमी झाले. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडांना जोरदार धडक दिली. बुधवारी (दि. ७) मध्यरात्री हा अपघात झाला.

मृत तरुणांमध्ये तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७), शेखर रमेश दुरपते (वय ३१), घनश्याम रामहरी पिसोटे (वय ३०, सर्व रा. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.उज्जैन येथे दर्शनासाठी सात मित्रांचा ग्रुप जात होता. या तरुणांच्या कारचालकाचे कन्नड घाटातील वळणावर नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाला, तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता, की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.

या भीषण अपघातात कारमधील योगेश तुकाराम सोनवणे (वय २८), अक्षय शिवाजी गिरे (वय २५), ज्ञानेश्वर कांता मोडे (वय २४, रा.), तुषार रमेश घुगे (वय २६, सर्व रा. शेवगाव) हे चौघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सध्या जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तरुणांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हा अपघात नेमका कसा झाला या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket