उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर
Home » Uncategorized » नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह सुशोभीकरण उद्घाटन समारंभ संपन्न

नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह सुशोभीकरण उद्घाटन समारंभ संपन्न 

नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह सुशोभीकरण उद्घाटन समारंभ संपन्न 

पाचगणी प्रतिनिधी- पाचगणी शहरातील प्रभाग क्रमांक दोन येथील आंबेडकर हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या सुशोभीकरण कामाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे व मुख्याधिकारी पंडित पाटील तसेच घाटजाई विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरसेवक शेखर कासुर्डे, नरेंद्र बिरामने, आकाश बगाडे, विमल भिलारे, अमित कांबळे, राजश्री सणस, परवीन मेमन, महेश खांडके, प्रकाश गोळे, राजेंद्र पारठे, स्वाती कांबळे, अमृता गोळे, शिल्पा माने, माधुरी कासुर्डे व सुप्रिया माने आदी मान्यवराची उपस्थिती होती.

यावेळी प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक नारायणशेठ बिरामने व सुप्रिया माने यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीचे संचालक मंडळ व पंचशील युवक मंडळ यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सांगता श्री. प्रकाश मोरे गुरुजी यांनी केली. या प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी नितीन कांबळे, संचालक संपत खरात, माजी उपाध्यक्ष सतीश साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ कांबळे, हौसाताई गायकवाड, रंजना घाडगे, सुनील भाऊ भोसले, कुमार कांबळे, संदीप गायकवाड, सिद्धार्थ घाडगे, सुरज कांबळे, किशोर मस्के, शब्देश मोरे, प्रशांत मोरे, अमरशेठ बिरामणे, मोहिनी गायकवाड, कमलताई शिंदे, सागर बोलके, विजय कांबळे, विकास बिरामणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या सुशोभीकरणामुळे सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सभागृह अधिक सुसज्ज होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल 

उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  नाशिक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या

Live Cricket