सलग सुट्ट्यांमुळे पाचगणी-महाबळेश्वर ‘हाउसफुल्ल’; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
पाचगणी प्रतिनिधी -सलग आलेल्या सुट्ट्या आणि वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी पाचगणी आणि महाबळेश्वरकडे धाव घेतल्याने वाई-पाचगणी आणि महाबळेश्वर मार्गावर आज सकाळपासूनच मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. पसरणी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून पर्यटकांना तासनतास एकाच जागी अडकून पडावे लागत आहे.
शनिवार आणि रविवारला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई, पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक थंडाव्यासाठी महाबळेश्वरला पसंती देत आहेत. मात्र, पर्यटकांची संख्या अचानक वाढल्याने रस्ते अपुरे पडू लागले आहेत. विशेषतः पाचगणी येथील दांडेघर नाका आणि महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
वाई-पाचगणी पसरणी घाटात वाहनांच्या ४- ६किमी लांब रांगा लागल्या आहेत त्यातच पाचगणी मध्ये काही पर्यटक हुल्लड भाजी करत असताना दिसत आहेत हेच हुलजबाद वाहतुकीचे नियम मोडत असल्यामुळे त्यातच अजून ट्राफिक जाम होताना दिसत आहे.
काही शाळेने शैक्षणिक सहल काढल्यामुळे मुलांचापुढचा प्रवास करणे खूप अवघड होताना दिसत आहे त्यामुळे पर्यटकांचा मनस्ताप निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक वाहतूक कोंडीमुळे हवालदिल झाले आहेत. “आम्ही सकाळी ९ वाजता पुण्याहून निघालो होतो, पण पाचगणी घाट चढायलाच दुपार झाली. घाटात दोन तास गाडी जागेवर उभी होती,” अशी प्रतिक्रिया एका पर्यटकाने दिली.
पोलिसांची कसरत: वाहतूक सुरळीत करण्यासाठी महाबळेश्वर आणि पाचगणी पोलीस तसेच होमगार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. मात्र, वाहनांचा ओघ इतका प्रचंड आहे की वाहतूक नियंत्रण करताना पोलिसांचीही दमछाक होत आहे. पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि संयम ठेवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



