फलटणच्या विकासासाठी आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
फलटण प्रतिनिधी – शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठीशी आणि फलटणच्या विकासासाठी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत काळजी करू नका अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह आपले नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी फलटण-कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिपकराव चव्हाण , सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर , फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी फलटण नगरपरिषद, शिवसेनेचे नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी उभे राहणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच फलटण शहराच्या विकासासंदर्भात कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.



