ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी प्रमोद लक्ष्मण माने, उपाध्यक्षपदी महादेव भिलारे
पाचगणी प्रतिनिधी-ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पाचगणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद लक्ष्मण माने यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी, तर महादेव भिलारे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या निवडीवेळी ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये तुकाराम निंबाळकर (राज्य कार्यकारिणी अध्यक्ष), रामचंद्र तांबे (उपाध्यक्ष), सतीश साकोरे (समन्वय समिती अध्यक्ष), विकास महाजन (कार्यवाह), संतोषबापू मगर (सचिव), उत्तम झेंडे (कोषाध्यक्ष) यांच्यासह प्रवीण गव्हाणे, सिताराम बवले, अस्लम तांबोळी, चिंतामणी गिरमकर आदी मान्यवरांचा समावेश होता.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, जनजागृती, तक्रार निवारण तसेच ग्राहक कल्याणासाठी प्रभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल प्रमोद लक्ष्मण माने व महादेव भिलारे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.




