विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न सातारा नगरपरिषदेत भाजपाची निर्विवाद सत्ता अमोल मोहितेंचा पदभार सोहळा उत्साहात संपन्न वाई नगरपालिका भाजपाच्या ताब्यात; दीपकदादा ननावरे ठरले विजयाचे सूत्रधार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठीसर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील पाचगणीच्या विकासाचे शिल्पकार नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सव उत्साहात
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » अँकरिंग करिअर करणाऱ्यांसाठी स्पष्ट व व्यावसायिक रोडमॅप साहिल शहा : ‘मिलियन रुपी अँकर’ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

अँकरिंग करिअर करणाऱ्यांसाठी स्पष्ट व व्यावसायिक रोडमॅप साहिल शहा : ‘मिलियन रुपी अँकर’ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

अँकरिंग करिअर करणाऱ्यांसाठी स्पष्ट व व्यावसायिक रोडमॅप साहिल शहा : ‘मिलियन रुपी अँकर’ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

सातारा : ‘आपल्या व्यवसायिक अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर येणाऱ्या पिढीला व्हावा या उद्देशाने डॉक्टर भाग्यश्री मोहन यांनी लिहिलेले पुस्तक या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकासाठी दीपस्तंभाचे काम करेल. अँकरिंग करिअर करणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे स्पष्ट व व्यावसायिक रोड मॅप आहे. मर्यादित शब्द संख्येच्या आधाराने अनुभवाचे संचित मांडताना भविष्याचा घेतलेला वेध हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य असल्याचे प्रतिपादन एसआयपीए डान्सिंग स्कूलचे सह संस्थापक साहिल शहा यांनी केले.

प्रसिद्ध अँकर, प्रशिक्षक व मोटिवेशनल स्पीकर डॉ. भाग्यश्री मोहन यांचे ‘मिलियन रुपी अँकर युवर रोड मॅप टू बिकम हायली पॅड अँकर’ या पुस्तकाचे महाबळेश्वर येथे प्रकाशन झाले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात साहिल शहा बोलत होते. यावेळी विचार मंचावर इव्हेंट मॅनेजर अँड प्लॅनर्स असोसिएशनचे शाम बसरानी, सीजन वेडिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन बेकिनकर, उद्योजक शरद जाधव, ॲट क्रिऊच्या अक्षदा भराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना लेखिका डॉ. भाग्यश्री म्हणाल्या, ‘अँकरिंगच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर प्रारंभी केवळ प्रशिक्षण नसल्याने अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. आपल्यासारखी परिस्थिती नवख्या निवेदकांवर येऊ नये या उद्देशाने हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला. समीक्षकांनीही याचे कौतुक केले. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा आनंद आहे.’ 

अँकरिंग, होस्टिंग आणि स्टेज प्रेझेन्स या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हे पुस्तक एक संपूर्ण मार्गदर्शक आहे. या पुस्तकामध्ये प्रोफेशनल अँकर कसे व्हावे, स्वतःचा ब्रँड कसा तयार करावा, आत्मविश्वास, कम्युनिकेशन स्किल्स, स्टेज हँडलिंग आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी अँकर होण्यासाठी आवश्यक असलेले प्रत्यक्ष अनुभव व मार्गदर्शन सोप्या भाषेत डॉ. भाग्यश्री यांनी मांडले आहे.

सोशल मीडियाच्या युगात पुस्तक वाचन कमी झाल्याचे बोलले जाते प्रत्यक्षात मात्र ‘मिलियन रूपी अँकर’ हे पुस्तक बेस्ट सेलिंग बुक म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गाजत आहे. वाचकांची भूक भागविण्याचा आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशी माहिती असल्याने या पुस्तकाला प्रतिसाद मिळाला. उपयुक्त माहिती असेल तर आजही पुस्तक हातात विकली जाऊ शकतात याची यानिमित्ताने खात्री पटली.

– डॉ. भाग्यश्री मोहन, लेखक

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न

Post Views: 28 विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न सातारा

Live Cricket