Home » राज्य » प्रशासकीय » बलाढ्य राष्ट्रवादीला धक्का देणारी झुंज; कुमार शिंदेंनी महाबळेश्वरात राजकीय समीकरणे हलवली

बलाढ्य राष्ट्रवादीला धक्का देणारी झुंज; कुमार शिंदेंनी महाबळेश्वरात राजकीय समीकरणे हलवली

बलाढ्य राष्ट्रवादीला धक्का देणारी झुंज; कुमार शिंदेंनी महाबळेश्वरात राजकीय समीकरणे हलवली

महाबळेश्वर(अली मुजावर) –मंत्री मकरंदआबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या पॅनलसाठी संपूर्ण ताकद पणाला लावलेल्या महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित एकतर्फी विजय मिळवता आला नाही. नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले असले, तरी कुमार शिंदे यांनी दिलेल्या कडव्या लढतीमुळे ही निवडणूक थेट निर्णायक वळणावर येऊन ठेपली.

कोणत्याही बड्या नेत्यांच्या सभा, स्टार प्रचारकांचा गाजावाजा नसताना कुमार शिंदे यांनी तब्बल पाच नगरसेवक निवडून आणत आपली राजकीय ताकद ठसठशीतपणे सिद्ध केली. सुरुवातीपासून एकतर्फी वाटणाऱ्या लढतीला त्यांनी थेट आव्हान देत बलाढ्य राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिला. दोन सीट्स कुमार शिंदे यांच्या अवघ्या दहा-पंधरा मतांनी जरी हरल्या असल्या तरी कुमार शिंदे यांचे पॅनल जायंट किलर  ठरले आहे. 

राजकीय जाणकारांच्या मते, कुमार शिंदे यांना जर थोडीशीही स्टार प्रचारकांची साथ लाभली असती, तर निकाल पूर्णपणे उलटाच लागला असता. अत्यंत मर्यादित साधनसंपत्ती, पण आक्रमक रणनीती, स्थानिक प्रश्नांवर थेट मांडणी आणि कार्यकर्त्यांवरची पकड यामुळे कुमार शिंदे हे या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचे नेतृत्व ठरले.

नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतरही विकास निधी आणण्याच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही, हे कुमार शिंदे यांनी आतापर्यंतच्या कामातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे येत्या काळात महाबळेश्वरच्या राजकारणात कुमार शिंदे हे दुर्लक्षित न करता येणारे प्रभावी नेतृत्व म्हणून उभे राहणार, हे निश्चित मानले जात आहे. मंत्री मकरंद आबा पाटील यांना  चार दिवस महाबळेश्वरला मुक्कामी येऊन  राहावे लागल्याने राष्ट्रवादीसाठी ही चिंतनीय बाब आहे 

या निवडणुकीने एक बाब स्पष्ट केली आहे—

महाबळेश्वरच्या राजकारणात आता एकहाती वर्चस्वाचा काळ संपत चालला असून, कुमार शिंदेंच्या रूपाने नवे, आक्रमक आणि निर्णायक नेतृत्व पुढे येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कैसे हराया टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये चाहत्यांना ज्या हाय-व्होल्टेज सामन्याची प्रतीक्षा होती, त्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Live Cricket