Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » कर्नाटकात भीषण अपघात, ट्रॅव्हल बसला लागलेल्या आगीत होरपळून दहा प्रवाशांचा मृत्यू

कर्नाटकात भीषण अपघात, ट्रॅव्हल बसला लागलेल्या आगीत होरपळून दहा प्रवाशांचा मृत्यू

कर्नाटकात भीषण अपघात, ट्रॅव्हल बसला लागलेल्या आगीत होरपळून दहा प्रवाशांचा मृत्यू

 कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात आज (२५ डिसेंबर) पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात दहा प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. बंगळुरूहून गोकर्ण तसेच शिवमोग्गाकडे जात असलेल्या ट्रॅव्हल बसला एका ट्रकने समोरून धडक दिली. त्यानंतर ट्रॅव्हल बसला लागलेल्या आगीत होरपळून किमान दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघात झाला त्यावेळी या स्लिपर ट्रॅव्हल बसमधील प्रवासी गाढ झोपेत होते. हिरीयूर तालुक्यातील गोरलाठू गावाजवळ हा अपघात झाला.

कर्नाटकातील बंगळुरूहून गोकर्णकडे ट्रॅव्हल बस जात होती. त्यावेळी चित्रदुर्ग जिल्ह्यातून ट्रॅव्हल बस जात असताना बाजूच्या रस्त्यावरून येणारा ट्रक दुभाजकावर धडकला व थेट समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल बसवर जाऊन धडकला. ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर ट्रॅव्हल बसने पेट घेतला. ट्रॅव्हल बसला लागलेल्या आगीत होरपळून किमान दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग ४८ वर हा अपघात झाला आहे.

जखमींना हिरीयूर व चित्रदुर्ग जिल्ह्यातील रूग्णालयांत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ट्रक हिरीयूरहून बंगळुरूकडे जात होता, अशी माहिती समोर आली आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कैसे हराया टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये चाहत्यांना ज्या हाय-व्होल्टेज सामन्याची प्रतीक्षा होती, त्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Live Cricket