श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा १९ वा वर्धापनदिन व संस्थापक नानासाहेब कासुडे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार
पाचगणी :येथील श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पाचगणी यांचा १९ वा वर्धापनदिन तसेच संस्थेचे संस्थापक नानासाहेब कासुडे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता सत्यनारायणाची महापूजा होणार असून सायंकाळी ५ वाजता तीर्थप्रसाद आणि संध्याकाळी ६ वाजता मान्यवरांचा गुणगौरव समारंभ व अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्यासाठी मंत्री मकरंदआबा पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार आनंदराव पाटील (नाना), राजेंद्रशेठ राजपुरे, नितीन दादा भिलारे, राजेंद्र भिलारे, साहेबराव बिरामणे, मयूर वोरा, विठ्ठल गोळे, अरुणभाई गोराडिया आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.



