Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » महाबळेश्वर पालिकेसाठी ‘विक्रमी’ ८३ टक्के मतदान; कोणाचे नशीब फळफळणार

महाबळेश्वर पालिकेसाठी ‘विक्रमी’ ८३ टक्के मतदान; कोणाचे नशीब फळफळणार

महाबळेश्वर पालिकेसाठी ‘विक्रमी’ ८३ टक्के मतदान; कोणाचे नशीब फळफळणार

महाबळेश्वर: निसर्गरम्य महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत मतदारांनी मोठा उत्साह दाखवला आहे. शनिवारी झालेल्या मतदानामध्ये एकूण ८३ टक्के मतदानाची नोंद झाली असून, वाढलेल्या या टक्क्याने आता राजकीय गणिते बदलणार की जुनेच वर्चस्व कायम राहणार, याबाबत शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

निवडणूक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर पालिकेच्या या निवडणुकीत एकूण १२,७०४ मतदार होते. त्यापैकी १०,५४७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. सकाळी संथ गतीने सुरू झालेले मतदान दुपारनंतर चांगलेच ओसंडून वाहू लागले, ज्यामुळे मतदानाचा आकडा ८३ टक्क्यांपर्यंत पोहोचला.

ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन म्हस्के आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी चोख नियोजन केले होते. मतदान केंद्रांवरील गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली.

नेहमीप्रमाणे “वाढलेले मतदान हे सत्तापालटाचे संकेत की सत्ताधाऱ्यांवरील विश्वास?” यावर आता ठिकठिकाणी खलबते सुरू झाली आहेत. १०,५४७ मतदारांचा हा कौल कोणाच्या पारड्यात पडणार आणि महाबळेश्वरच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याचे उत्तर आता मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.सर्व उमेदवारांचे भवितव्य आता मतदान यंत्रांत (EVM) बंद झाले असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

Post Views: 39 वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई

Live Cricket