अरुणाचलमध्ये कामगारांना घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला! १४ जणांचा मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर
अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सीमेजवळ २२ कामगारांना घेऊन जाणारा एक ट्रक दरीमध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आसामचे रहिवासी असलेल्या १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कराने या भागात शोध आणि बचाव मोहिम सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी घडली, मात्र दुर्घटनेतील बचावलेला एक व्यक्ती बुधवारी रात्री प्रशासकीय अधिकार्यांपर्यंत पोहचल्यानंतर या भीषण अपघाताबद्दल माहिती मिळाली.
ही घटना अंजवा जिल्ह्यातील चागलगाम येथे घडली आणि हे कामगार वाहनातून आसामच्या तिंसुकिया जिल्ह्यातून आले होते.अरुणाचल प्रदेशच्या चागलगाम येथील डोंगरात भारतीय लष्कराकडून एक मोठी शोध आणि बचाव मोहिम सुरू करण्यात आली आहे. तिंसुकिया येथील २२ कामगारांना घेऊन जाणेरे एक सिव्हीलियन वाहन केएम ४० जवळील एका दरीत केसळल्यानंतर ही मोहिम राबवली जात आहे, असे लष्कराने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.




