तपोवनातील वृक्षतोड : समोपचाराने तोडगा काढण्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आवाहन
अभिनेते सयाजी शिंदे यांची पर्यावरण हिताची भूमिका
सातारा – तपोवन परिसरातील सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत समोपचाराने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
मंत्री अजितदादा यांनी स्पष्ट केले की, विकासकामे महत्त्वाची असली तरी त्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. “पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांच्या या भूमिकेला पर्यावरणप्रेमींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवावा, अशी सामूहिक मागणी होत आहे. विकास आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही गोष्टींचा विचार करून निर्णय घेण्याचे आवाहन नागरिकांनीही प्रशासनाला केले आहे.




