स्व.दत्तात्रय पांडुरंग मेणबुधले स्मृती प्रतिष्ठानतर्फे वाईत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
वाई- दक्षिण काशी म्हणून समजले जाणाऱ्या वाई येथे स्वर्गीय दत्तात्रय पांडुरंग मेणबुधले यांच्या पुण्यस्मरणादिनानिमित्त स्वर्गीय दत्तात्रय पांडुरंग मेणबुधले स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता आदर्श पालक विद्यार्थी पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. श्री अरुण सर्जेराव बाबर व तुषार अरुण बाबर.सौ संगीता शिवराम मराठे, अशोक शिवराम मराठे कू.श्रद्धा अशोक मराठे पुरस्कारार्थी असणार आहेत. तर याच वेळी तालुकास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेचे बक्षीस समारंभ सुद्धा आयोजित केल्याची माहिती संयोजकांनी दिली. तसेच शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2026 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विजयकुमार परीट गटविकास अधिकारी पंचायत समिती वाई डॉक्टर सचिन पाटील वैद्यकीय अधिकारी वाई यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर होणार आहे. आस्था वृद्धाश्रम वाई येथे दुपारी बारा वाजता अन्नदान होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. ष.ब्र.108 ज्ञान भास्कर महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, मठाधिपती वीरशैव लिंगायत मठ संस्थान, वाई भूषवणार आहेत.. तर प्रमुख वक्ते म्हणून श्री. संजय कळमकर असणार आहेत.
मा. डॉ. योगेश खरमाटे (प्रांताधिकारी, वई),
मा. सौ. सोनाली मेटकरी–शिंदे (तहसीलदार, वाई),
मा. श्री. सुनील साळुंखे (पोलीस उपअधीक्षक, वाई),
मा. श्री. विजयकुमार पाटील (गटविकास अधिकारी),
मा. श्री. जितेंद्र शहाणे (पोलीस निरीक्षक, वाई)
अजयकुमार सिंदकर पोलीस निरीक्षक कोल्हापूर
या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती असल्याचे प्रतिष्ठान तर्फे सांगण्यात आले.






