मेढा प्रतिनिधी:२६/११च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले अशोक चक्र सन्मानित केडंबे गावचे सुपुत्र हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या १७व्या स्मृतिदिनानिमित्त उद्या बुधवारी (ता:२६)केडंबे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथदादा ओंबळे यांनी दिली.

उद्या सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा ओंबळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता खाऊ वाटप होणार आहे. सकाळी साडे अकरा वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार शाहीर दानवले यांचे देशभक्तीपर गीते व पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थ मंडळ व जनसेवा विकास प्रतिष्ठान केडंबे यांनी केले आहे.




