अपक्ष डॉक्टर अभिजीत बिचुकले यांची ठसठशीत कामगिरी; २,७७२ मते मिळवत चौथा क्रमांक मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीपभाऊ बगाडे विजयी महाबळेश्वर नगराध्यक्षपदी सुनील शिंदे; मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाला मतदारांची पसंती वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा १९ वा वर्धापनदिन व संस्थापक नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार
Home » राज्य » प्रशासकीय » सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा ना.शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना मोठे यश; नागेवाडी येथील जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर

सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा ना.शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना मोठे यश; नागेवाडी येथील जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर 

सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा ना.शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना मोठे यश; नागेवाडी येथील जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर 

सातारा- सातारा जिल्ह्यातील युवकांना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळावी यासाठी सातारा जिल्ह्यात आयटी पार्क व्हावे, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून नागेवाडी ता. सातारा येथील ४२ हेक्टर ८७ आर इतकी जागा आयटी पार्क साठी औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली असून सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत. 

सातारा जिल्ह्यातील आयटी क्षेत्राशी निगडीत इंजिनियर्स आणि युवक व युवतींना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, येथील युवकांना पुणे, मुंबई यासह अन्य शहरात नोकरीसाठी जावे लागू नये यासाठी सातारा तालुक्यातील नागेवाडी (लिंब खिंड) येथील शासकीय जागेत आयटी पार्क उभारण्यात यावा, यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभ्यासपूर्ण पाठपुरावा सुरु केला होता. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपूर्वीच सदर जागेची पाहणी एमआयडीसी विभागामार्फत करण्यात आली होती. ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार त्याचा परिपूर्ण अहवाल आणि प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. 

सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता द्यावी अशी मागणी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे होती. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत नागेवाडी ता. सातारा येथील गट नं. ३०८/१ येथील ४२ हेक्टर ८७ आर एवढे क्षेत्र आयटी पार्क यासाठी आरक्षित करण्याचे नोटिफिकेशन जारी करून ही जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच पुढील कार्यवाही गतीने केली जाणार आहे. पुढील कार्यवाही गतीने होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.     

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अपक्ष डॉक्टर अभिजीत बिचुकले यांची ठसठशीत कामगिरी; २,७७२ मते मिळवत चौथा क्रमांक

Post Views: 24 अपक्ष डॉक्टर अभिजीत बिचुकले यांची ठसठशीत कामगिरी; २,७७२ मते मिळवत चौथा क्रमांक सातारा प्रतिनिधी :बिग बॉस फेम

Live Cricket