बिहार एनडीएच्या महाविजयाचा साताऱ्यात जल्लोष मोती चौकात ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उपस्थिती
सातारा – बिहारमध्ये भाजपा प्रणित एनडीएने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयानंतर साताऱ्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या महाविजयाचा जल्लोष साताऱ्यातील मोती चौकात कार्यकर्त्यांनी दणदणीतपणे साजरा केला.
ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि उत्साहाने भारलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि त्यांचा जल्लोष पाहून वातावरण उत्सवी झाले.
या आनंदसोहळ्याची शोभा वाढवणारी बाब म्हणजे मंत्री तथा साताऱ्याचे लोकप्रिय नेते नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उपस्थिती. त्यांच्या आगमनाने जल्लोषाला नवचैतन्य लाभले. कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वाचे व विजयातील योगदानाचे कौतुक केले.सातारा शहरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.कार्यकर्त्यांच्या उत्साहातून “एनडीएचा महाविजय म्हणजे विकसित भारताच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल” असा संदेश देण्यात आला.



