महिला सबलीकरण राष्ट्रीय चळवळ व्हावी डॉ.भाग्यश्री मोहन : भारत बियाँड बाउंड्रीजच्या माध्यमातून होणार विविध उपक्रमांचा जागर
सातारा दि. १ (प्रतिनिधी) : महिलांच्या सबलीकरणावसाठी व्यवसाय विकास आणि उद्योजकता वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. भारत बियाँड बाउंड्रीज या फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणाने राष्ट्रीय चळवळीचे रूप घ्यावे यासाठी प्रयत्नंची पराकाष्ठा करू अशी ग्वाही फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष डॉ. भाग्यश्री मोहन यांनी दिली आहे.
महाबळेश्वर येथे भारत बियाँड बाउंड्रीजच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. भाग्यश्री बोलत होत्या. विचार मंचावर कर्नल मोहन शिंदे, एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापक योगेश लंकड, भारत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भारत पाटील रॉक लाईट वेंचर्स चे सीईओ निखिल पवार यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भाग्यश्री म्हणाल्या, ‘आपल्यातील कलागुणांना वाव देऊन नियमित नोकरीसह स्वतंत्र पैसे कमावण्याची संधी सध्या विविध कोर्सेसच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. महिलांनी याचा लाभ घेतला पाहिजे. या फाऊंडेशनतर्फे जागृतीपर व्याख्यानमाला, विविध कार्यक्रम तसेच महिला सन्मान पुरस्कार सोहळे आयोजित करून त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा दिली जाते. गेल्या ५ वर्षांत संस्थेने अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि शाश्वत विकासासाठी सक्षम केले आहे.”
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
भारत बियाँड बाउंड्रीज फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याकडील कलागुणांचा आर्थिक उन्नतीसाठी उपयोग करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यात नोकरी व्यवसाय सांभाळून विद्यार्थ्यांना आपल्या अंगभूत कलागुणांचा वापर करून आर्थिक स्थैर्य देण्याचे प्रशिक्षण दिले गेले. गेल्या वर्षभरात दैनंदिन काम करून तब्बल ७० विद्यार्थ्यांनी दहा लाख रुपयाहून अधिकचे उत्पन्न मिळविले. अशा विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
प्रत्येकाकडे एक स्वतंत्र व्यक्ती गुण असतो आपल्याकडील गुणाची जाणीव झाली की हे गुण वृद्धिंगत करण्यासाठी फाउंडेशन काम करते. महिलांच्या हाताला रोजगार असो की तरुणाईला व्यवसायाची संधी विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून हाताला काम आणि कष्टाला दाम मिळवून देण्यासाठी फाउंडेशन कार्यरत आहे. गेल्या वर्षभरात साडेतीनशेहून अधिक लखपती फाउंडेशनच्या मार्फत तयार झाले आहेत.
– डॉ. भाग्यश्री मोहन, संस्थापिका, भारत बियाँड बाउंड्रीज फाउंडेशन



