Home » देश » वाईत राष्ट्रवादीची चिंता वाढली! भाजप मोठ्या खेळासाठी सज्ज

वाईत राष्ट्रवादीची चिंता वाढली! भाजप मोठ्या खेळासाठी सज्ज

वाईत राष्ट्रवादीची चिंता वाढली! भाजप मोठ्या खेळासाठी सज्ज

वाई नगरपालिकेत सत्ता संघर्ष तापला! भाजपाचे आव्हान राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी

वाई प्रतिनिधी -मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाला मानणाऱ्या वाई नगरपालिकेत यंदाची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी ही निवडणूक आधीच कठीण मानली जात आहे, अनेक आजी-माजी नगरसेवकांनी भाजपातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. सुरु वातीस एकतर्फी निवडणूक मानली जात असलेली ही लढत राष्ट्रवादीसाठी अधिक जड झाली आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष दीपकदादा ननावरे आणि माजी आमदार मदन दादा भोसले यांच्या समन्वयातून वाई शहरात भाजपची संघटनात्मक ताकद झपाट्याने वाढत आहे. मागील निवडणुकीत वाई नगरपालिकेवर भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आला होता, त्यामुळे पक्षाला यावेळीही विस्ताराची मोठी संधी दिसत आहे.

दरम्यान, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वाई शहरातील भाजप इच्छुकांना एकत्रित करून आगामी निवडणुकीत भाजपाचा झेंडा अधिक मजबुतीने रोवण्यासाठी तयारीला वेग दिला आहे. दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.सध्या भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका, राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडी आणि संभाव्य उमेदवारांतील बदल यांमुळे वाई नगरपालिकेची निवडणूक अधिक चुरशीची आणि अनिश्चित झाली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन पाचगणी प्रतिनिधी-न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त इयत्ता पहिली

Live Cricket