Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आदरणीय शरद पवार साहेब गटाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक; विविध पक्षांचा नगरपरिषद निवडणुकीसाठी रणनीतीवर मोहर

आदरणीय शरद पवार साहेब गटाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक; विविध पक्षांचा नगरपरिषद निवडणुकीसाठी रणनीतीवर मोहर

आदरणीय शरद पवार साहेब गटाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक; विविध पक्षांचा नगरपरिषद निवडणुकीसाठी रणनीतीवर मोहर

सातारा नगरपरिषद निवडणुकीत ताकदीने लढण्याचा निर्धार- मा.राहुल पवार 

सातारा: आगामी सातारा नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कार्यालयात विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना उभाटा गटाचे नेते नरेंद्रजी पाटील, उभाटा गटाचे प्रवक्ते नितीन बानगुडे पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सातारा नगरपरिषदेतील 25 प्रभागांमध्ये सक्षम आणि स्पर्धात्मक उमेदवार उभे करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक प्रभागात ताकदीने निवडणूक लढवण्याचा सर्वांनी निर्धार व्यक्त केला.या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष प्रणव सावंत, बाळासाहेब शिंदे, गणेश अहिवळे तसेच मनसेचे शहर उपाध्यक्ष भरत रावळ यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते. विविध पक्षांनी एकमेकांशी समन्वय राखत आगामी निवडणुकीत प्रभावी रणनीती उभी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रोहास संघटना डॉक्टरांच्या हक्कांसाठी कायम तत्पर राहील : डॉ मनोहर ससाणे

रोहास संघटना डॉक्टरांच्या हक्कांसाठी कायम तत्पर राहील : डॉ मनोहर ससाणे रुरल हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (रोहास), जिल्हा

Live Cricket