Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शुक्रवारपासून साताऱ्यात ग्रंथ महोत्सव सकाळी ग्रंथदिंडी, दुपारी परिसंवाद

शुक्रवारपासून साताऱ्यात ग्रंथ महोत्सव सकाळी ग्रंथदिंडी, दुपारी परिसंवाद

शुक्रवारपासून साताऱ्यात ग्रंथ महोत्सव सकाळी ग्रंथदिंडी, दुपारी परिसंवाद

सातारा: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ‘सातारा पाटर्न ‘म्हणून ग्रंथमहोत्सवाची वेगळी ओळख आहे.हा ग्रंथमहोत्सव शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे तीन दिवस जिल्हा परिषद मैदानावर विवीध साहित्यिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे 

उद्या कर्मवीर समाधीपासून ग्रंथ दिंडीचा प्रारंभ होईल. या महोत्सवामध्ये उद्घाटन सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांचे खुमासदार व्याख्यान आहे तर दुपारच्या सत्रामध्ये साताऱ्याच्या साहित्य संमेलनाच्या आठवणी सांगितल्या जाणार आहेत. यामध्ये प्राध्यापक इंद्रजीत भालेराव, श्याम भुरके, संभाजीराव पाटणे, शिरीष चिटणीस,मुकुंद फडके,श्रीकांत कात्रे, ऍड सीमंतिनी नुलकर सहभागी होणार आहेत यांनी प्रत्यक्ष सायंकाळी ‘सोनेरी चंदेरी’ हा बहरदार गीतांचा कार्यक्रम महोत्सवाची रंगत वाढवणार आहे. महोत्सवामध्ये पुस्तकांचे अनेक स्टॉल आले असून, वाचकांना सवलतीमध्ये पुस्तके उपलब्ध होणार आहेत. तरी रसिक वाचकांनी ग्रंथ महोत्सवाचा लाभ घ्यावा.असे आवाहन ग्रंथ महोत्सव समितीने केले आहे 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले “आजच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवपिढीच्या शिलेदारांचे हस्ते प्रज्वलित करण्यात आलेली ही

Live Cricket