Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राज्यातील दुसरी व जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली बोपर्डी — “ग्रामपंचायत प्रशासन आपल्या दारी” उपक्रमातून पारदर्शक प्रशासन व लोकसहभागाचा आदर्श

राज्यातील दुसरी व जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली बोपर्डी — “ग्रामपंचायत प्रशासन आपल्या दारी” उपक्रमातून पारदर्शक प्रशासन व लोकसहभागाचा आदर्श

राज्यातील दुसरी व जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली बोपर्डी — “ग्रामपंचायत प्रशासन आपल्या दारी” उपक्रमातून पारदर्शक प्रशासन व लोकसहभागाचा आदर्श

बोपर्डी (ता. वाई, जि. सातारा):ग्रामपंचायत प्रशासन आपल्या दारी” हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी सातारा जिल्ह्यातील पहिली व राज्यातील दुसरी ग्रामपंचायत म्हणून बोपर्डी ग्रामपंचायतने विशेष यश संपादन केले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील २४ महत्त्वाचे मुद्दे थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या दरम्यान ग्रामस्थांच्या सूचना व अभिप्राय ऐकून घेणे, वसुली कार्य पार पाडणे तसेच जनसंपर्क साधणे अशा सर्वसमावेशक उपक्रमांमुळे प्रशासनात पारदर्शकता वाढली असून लोकसहभागात लक्षणीय वाढ झाली आहे.

हा अभिनव उपक्रम ग्रामपंचायत अधिकारी श्री. शंकर चिकटूळ यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला असून, सरपंच श्री. शंकर शिवराम गाढवे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने हा उपक्रम प्रभावीपणे अंमलात आणला आहे.

या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीत नवचैतन्य आले असून, ग्रामस्थांना त्यांच्या हक्काच्या सेवा व योजनांची माहिती थेट प्रशासनाकडून मिळत आहे.

 “ग्रामपंचायत प्रशासन आपल्या दारी” — लोकशाहीतील पारदर्शकतेचा आणि ग्रामविकासातील लोकसहभागाचा उत्तम नमुना!

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket