Home » राज्य » शिक्षण » गौरीशंकर देगाव फार्मसी मध्ये कौशल्य विषयक कार्यशाळा संपन्न

गौरीशंकर देगाव फार्मसी मध्ये कौशल्य विषयक कार्यशाळा संपन्न 

गौरीशंकर देगाव फार्मसी मध्ये कौशल्य विषयक कार्यशाळा संपन्न 

शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

देगाव – पारंपारिक शिक्षण कालबाह्य होत असल्याने आधुनिक व कौशल्य विकसित शिक्षण विद्यार्थ्यांना या पुढील काळात मिळणे गरजेचे आहे नव्या पिढीला स्किल बेसड एज्युकेशनच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयाने फार्मसी विद्यार्थ्यांसाठी तंत्र व कौशल्य विषयक कार्यशाळेचे आयोजन केले होते एक सप्ताहभर सुरू असलेल्या या कार्यशाळेत शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्ये विकासाचे धडे देण्यात आले कौशल्य विकसित कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असणारे कौशल्ये बाबत नांदी फाउंडेशन पुण्याचे तज्ञ मार्गदर्शक लूईस शेळके ,प्रियांका शर्मा ,मोहन सुरळकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर, उपप्राचार्य डॉ.योगेश गुरव ,डॉ. सीमादेवी कदम, प्रा. अनुराधा साळुंखे ,प्रा.ज्योती सलगर आदी प्रमुख उपस्थित होते .

यावेळी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक व आभार प्रबंधक हेमंत काळे यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कैसे हराया टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये चाहत्यांना ज्या हाय-व्होल्टेज सामन्याची प्रतीक्षा होती, त्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Live Cricket