बँक ऑफ महाराष्ट्रकडून महिला बचत गटांना ११ कोटींचे कर्जवाटप
कराड प्रतिनिधी -उंब्रज येथे नुकताच बँक ऑफ महाराष्ट्राचा महाकर्ज वाटप मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यासाठी कराड पाटण कोरेगाव सातारा खटाव इत्यादी तालुक्यातील बचत गटांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये बोलताना प्रकल्प संचालक श्री विश्वास सिद सर यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे कौतुक करताना एकाच दिवशी जवळजवळ 200 गटांना 11 कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले त्याबद्दल समाधान व्यक्त केले पुढे बोलतात ते मिळाले सातारा जिल्ह्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र एक अग्रणी बँक असून देशाच्या विकासासाठी महिलांमध्ये महिलांची भूमिका खूप महत्त्वाची असून त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे अर्थसहाय्य मिळाल्याने महिलांना नवीन व्यवसाय वृद्धीकरता भांडवल उपलब्ध होणार आहे या भांडवलाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये रोजगारही उपलब्ध होणार आहेत सातारा जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये बँकेने आजपर्यंत खूप सारे कर्जवाटप केले आहे.
अंकुश मोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून अनेक गटांची क्षमता बांधणी योग्य रीतीने होत आहे त्यामुळे बँकांनी वित्त सहाय्य करण्यास सुलभता निर्माण झाली आहे. या कार्यक्रमाची प्रस्ताविक श्री सौरभ सिंग सर यांनी केले प्रास्ताविकात बँकेच्या कार्याची माहिती देऊन बँक सदैव महिलांच्या पाठीशी उभी राहील असे सांगितले . या कर्ज वाटप मेळाव्यास पाचशेहून अधिक महिला उपस्थित होत्या . यावेळी अभियान व्यवस्थापक श्री निलेश पवार श्री कुंभारदरे श्री रंजन वायदंडे, माधवी वनारसे व एम एस आर एल एम स्टाफ उपस्थित होता.कार्यक्रमाचे आभार श्री उपांचल प्रबंधक महेश कुरेकर यांनी मांडले तर सूत्रसंचालन नितीराज साबळे यांनी केले
