Home » राज्य » शिक्षण » सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार

सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार  

सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार  

दिल्ली- सीबीएसईच्या पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला 45 लाख विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानं 2026 साठी दहावी आणि बारावीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईनं दहावी आणि बारावीचं संभाव्य वेळापत्रक जारी केलं आहे. बोर्डाच्या अधिकृत नोटीसनुसार पहिल्या टप्प्यातील 17 फेब्रुवारी 2026 ला परीक्षा सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 15 जुलै 2026 ला संपेल. या वेळी मुख्य परीक्षेसह विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे.दहावीची दुसरी परीक्षा आणि बारावीची पुरवणी परीक्षा देखील आयोजित केली जाणार आहे.

सीबीएसईच्या संभाव्य डेटशीट नुसार, दहावीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारीला सुरु होईल तो 6 मार्च 2026 ला संपेल. दहावीची दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे रोजी सुरु होईल ती 1 जूनला संपेल. बारावीची बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारीला सुरु होईल ती 9 एप्रिल 2026 ला संपेल.  

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन पाचगणी प्रतिनिधी-न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त इयत्ता पहिली

Live Cricket