Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक – प्रतिमा नितीन पाटील

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक –  प्रतिमा नितीन पाटील

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक –  प्रतिमा नितीन पाटील

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या घरात एक परिवार आहे या परिवारातील महिला हाच प्रमुख घटक असतो याच महिलांना अनेक आजार वृद्ध काळापर्यंत होत असतात याच महिलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग मार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान राबविले जात असून हे कौतुकास्पद असल्याचे मत सौ प्रतिमा नितीन जाधव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे ता.वाई येथे घेण्यात आली होती त्यावेळी त्या बोलत होत्या.

पंचायत समिती गटविकास अधिकारी विजयकुमार परीट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्या आदेशानुसार वाई तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येकी 12 शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून 28 आरोग्य उपकेंद्रात 168 शिबिरांची आयोजन दिनांक 17 ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे वाई तालुक्यातील आरोग्य विभागामार्फत प्राथमिक व उपकेंद्र या ठिकाणी या अभियानाची आयोजन करण्यात आले आहे या अभियानात महिलांची नेत्र तपासणी रक्तदान शिबीर क्षयरोग तपासणी व गरोदर महिलांची सर्व तपासणी रक्तदाब शुगर ओरल कॅन्सर बेस्ट कॅन्सर हिमोग्लोबिन तपासणी अशा अनेक आजारांच्या तपासण्या कवठे आरोग्य केंद्राचे डॉ. दीक्षा वाघमोडे व डॉ. दिलीप भोजने यांच्यामार्फत केल्या तसेच वेळे येथील आराम हॉटेल व पिंजरा कला संस्कृत केंद्राचे मालक रोहन यादव तसेच वाई तालुका कर्मचारी संघटनेचे रविभाऊ जाधव प्रशांत मांढरे अजित जगताप नरेद्र सणस गणेश यादव यांच्या मार्फत क्षयरोग रुग्णांना दहा निश्चय किट देण्यात आले व 60 महिलांचे आयुष्यमान भारत कार्ड चे वाटप ही करण्यात आले या कार्यक्रमात वीर माता कमल पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या अभियान कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील कवठे गावच्या सरपंच सौ मंदाकिनी पोळ महादेव मस्कर राजेंद्र पोळ शिवाजी डेरे विठ्ठल शिंदे सर्व आरोग्य कर्मचारी आशा आगणवाडी सेविका ग्रामस्थ महिलावर्ग उपस्थित होत्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन पाचगणी प्रतिनिधी-न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त इयत्ता पहिली

Live Cricket