बोंडारवाडी धरणाचे जलनायक कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांचा शनिवारी तृतीयस्मृतिदिन
केळघर ता:१९: बोंडारवाडी धरणाचे जलनायक कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांच्या तृतीयस्मृतिदिनानिमित्त उद्या शनिवारी (ता:२० )दुपारी तीन वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन नांदगणे येथील श्री. स्वामी समर्थ मंगल कार्यालयात केले आहे अशी माहिती कृती समितीचे वतीने देण्यात आली.या शेतकरी मेळाव्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर,सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तसेच या मेळाव्यास तालुक्यातील सर्व आजी,माजी अधिकारी व पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबई – पुणे ग्रामस्थ, युवक, सर्व मंडळांचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृती समितीचे वतीने करण्यात आले आहे.





