चाटे क्लासेसने आयोजित केले विज्ञान प्रदर्शन
विज्ञानाला मानवतेची जोड द्यावी: यशेन्द्र क्षीरसागर
सातारा, दिनांक ७: भारताला वैज्ञानिक ज्ञानाची खूप मोठी परंपरा आहे. विज्ञानाला मानवतेची जोड दिली तर खऱ्या अर्थाने देश महान होईल “असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते, लेखक, विद्यार्थी मार्गदर्शक यशेन्द्र क्षीरसागर यांनी केले. येथील चाटे क्लासेसने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. रुपेश ससाने, राजेंद्र घुले, डॉ. पंडितराव लोंढे, रंजना जाधव, तुळशीदास डोईफोडे, सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी 37 वैज्ञानिक उपकरणे तयार करून सर्वांची मने जिंकली. श्री क्षीरसागर पुढे म्हणाले”विज्ञान आणि अध्यात्म यांची जोड महत्त्वाची आहे. मानवता, आपुलकी ,प्रेम ही शाश्वत मानवी मूल्ये टिकवायची असतील तर विज्ञानाचा मानवतेच्या अंगाने विचार करायला हवा. ८०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये “उदका माजी मिसे, चैतन्य वसे!तेने माजी दिसे विजे मध्ये”अशा भाषेमध्ये पाण्यामध्ये सुद्धा त्यांना चैतन्य आणि वीज दिसली आणि पुन्हा आपण पाण्यापासून वीज निर्माण केली. इतका मोठा कालपट विज्ञानाने व्यापलेला आहे. विद्यार्थ्यांनी डॉ.ए पी जे अब्दुल कलाम, जयंत नारळीकर ,अनिल काकोडकर , रघुनाथ माशेलकर यांचा आदर्श ठेवावा. शिक्षकांनी सुचवलेला मार्ग आदर्श पद्धतीने अनुसरावा. जीवन सुसह्य आणि सुखी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संवेदनशीलतेने संशोधन करावे. ते समाजाला उपयोगी असावे. गोरगरीब देशवासीयांसाठी विज्ञानाचे संशोधन उपयोगी ठरावे केवळ भौतिक प्रगती म्हणजे प्रगती नसून संवेदनशीलतेशिवाय प्रगतीला अर्थ नाही”. मराठी विषयाच्या शिक्षिका श्रीमती कोल्हटकर यांनी सूत्रसंचालन केले . श्री.राजेंद्र घुले यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. आनंदे यांनी आभार मानले.
