वसंतराव भिलारे यांनी महाबळेश्वर आगारात प्रामाणिकपणे ३३वर्षे सेवा दिली-महेश शिंदे
केळघर :महाबळेश्वर आगारातील वाहन परीक्षक वसंतराव भिलारे हे आपल्या ३३वर्षांच्या प्रदीर्घ राज्य परिवहन सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सत्कार आगार प्रशासनाच्या वतीने आगार लेखाकर महेश शिंदे, सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ, कामगार संघटना अध्यक्ष सुदर्शन शिंदे, सचिव संतोष सावंत,कार्यशाळेच्या वतीने लखन वायदंडे यांनी सत्कार केला.
महेश शिंदे म्हणाले, वसंतराव भिलारे यांनी महाबळेश्वर आगारात प्रामाणिकपणे ३३वर्षे सेवा दिली. त्यांचा आदर्श कामगारांनी घेऊन एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीत आपले योगदान द्यावे. यावेळी चंद्रकांत वळकुंदे,संतोष शिंदे,विठ्ठल चव्हाण, संतोष सावंत यांनी आपल्या भाषणातून वसंतराव भिलारे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना श्री .भिलारे यांनी आगारातील सर्व आधिकारी व कामगार यांनी साथ दिल्याने ३३वर्षे चांगली सेवा केल्याचे नमूद केले. या कार्यक्रमास महेश शं. शिंदे, चंद्रकांत धाराशिवकर,वसंतराव गाडवे, शंकर इथापे, अरुण कासुर्डे, चंद्रकांत कासुर्डे, रियाझ सय्यद, लक्ष्मण उतेकर, शंकर खरात, दिलीप बेलोशे, विजय जमदाडे, संदीप जगताप,सुदेश भिलारे, श्रीकांत भिलारे यांच्यासह महाबळेश्वर आगारातील चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी व भिलारे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
