Home » राज्य » प्रशासकीय » मी जिवंत आहे! मोदी-पुतिन आणि जिनपिंग यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

मी जिवंत आहे! मोदी-पुतिन आणि जिनपिंग यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

मी जिवंत आहे! मोदी-पुतिन आणि जिनपिंग यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): अमेरिकेच्या टॅरिफ धोरणानंतर इतर बलाढ्य देशांनी मोर्चा उघडला आहे. रशियाकडून तेल आयात करण्याचं कारण देत अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला होता. या दबावानंतर भारत झुकेल असं वाटलं होतं. पण त्याच्या विरुद्ध फासे पडताना दिसत आहे. भारताची रशिया आणि चीनसोबत जवळीक वाढताना दिसत आहे. शांघाई सहयोग संघटन समिटमध्ये हे तीन देश एका व्यासपीठावर आले. यामुळे अमेरिकेचे धाबे दणाणले आहेत.

असं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मिडिया पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मी जिंवत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे नेमकं काय झालं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याला कारणंही सोशल मीडियाच आहे. गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत अफवा उडाल्या होत्या. तसेच एक्स मिडिया प्लॅटफॉर्मवर ‘डोनाल्ड ट्रम्प डेड’ हे ट्रेण्ड होत होतं. त्यामुळे अफवांचं पेव फुटलं होतं. अखेर यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पडदा टाकला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 231 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket