मनोज जरांगे अखेर मुंबईकडे निघाले; सरकारला जाग येणार का?
सातारा -शेकडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोबत 15 ते 20 दिवस पुरेल एवढे राशन त्यांनी सोबत घेतलं आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असा निर्धार यावेळी मराठा बांधवांनी केला आहे. ग्रामीण भागात ओबीसी समाजाचा सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील वडीगोद्री फाट्यावरून मुंबईकडे रवाना होत आहे. त्यांचा पहिला मुक्काम हा जुन्नर येथे होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही त्यांची मागणी आहे. आता सरकारला खूप वेळ दिला. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांची प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येत आहे. त्यामुळे आता सरकारने मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण द्या अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. आताच लाखोंचा जमाव अंतरवाली सराटीत दिसला. शहागडवरून हा मोर्चा जुन्नरकडे जाणार आहे. पुढे मुंबईत हा मोर्चा दाखल होईल. आता अटीतटीची लढाई होणार आहे. आता आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तर गेल्यावेळीप्रमाणेच यावेळी सुद्धा मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा असल्याचे दिसून येत आहे.
