Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आटके येथील तलाठी कार्यालय व भक्त निवासचे भूमिपूजन इंद्रजीत चव्हाणांच्या हस्ते संपन्न

आटके येथील तलाठी कार्यालय व भक्त निवासचे भूमिपूजन इंद्रजीत चव्हाणांच्या हस्ते संपन्न

आटके येथील तलाठी कार्यालय व भक्त निवासचे भूमिपूजन इंद्रजीत चव्हाणांच्या हस्ते संपन्न

कराड :माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमध्ये कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. त्या कामांची अजून भूमिपूजन व उदघाटन सुरु आहेत, विकास हेच ध्येय ठेवून पदाचा सामाजिक कामासाठी उपयोग करून आपले आयुष्य व्यतीत करणारे पृथ्वीराज चव्हाण हे एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे असे प्रतिपादन इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले. आटके येथील तलाठी कार्यालय व भक्त निवास या दोन्ही विकास कामाचे भूमिपूजन इंद्रजीत चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आटके गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रोहिणी नितीन पाटील, उपसरपंच रमेश जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, गजानन आवळकर, ग्रा.प सदस्य सुरेश पाटील, बी.जी. काळे सर, संजय जाधव, हंबीरराव पाटील, सुनील जाधव, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, अवधूत पाटील यांच्यासह प्रशासकीय अधीकारी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना इंद्रजीत चव्हाण म्हणाले कि, कराड दक्षिण मधील गावांनी पृथ्वीराज बाबांच्यावर कायमच प्रेम केले आहे. आटके गाव यामध्ये अग्रेसर राहिले आहे. गावामध्ये विकासाचा दृष्टिकोन जपण्याचं चांगलं काम गावाने कायम जपले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचा एकच ध्यास आणि विचार आहे कि, आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग मतदार संघातील जनतेसाठी झाला पाहिजे यासाठी त्यांना आजपर्यंत जी जी पदे मिळाली त्यामध्ये त्यांनी स्वतःचा स्वार्थ न साधता समाजाचा जनतेचा कायम विचार केला आहे, धोरणात्मक व सामाजिक विकासाचा ध्यास ठेवला आहे. पृथ्वीराज बाबा ज्या ज्या पदावर होते त्यां त्या वेळी घेतलेल्या निर्णयामुळे देशातील- राज्यातील जनतेचा नक्कीच फायदा झाला आहे जो आजही अनेक योजनांमधून लोकांना मिळत आहे. असा दृष्टिकोन ठेवून चव्हाण कुटुंबीय कायम राजकारणात कार्यरत आहेत. सामाजिक ध्यास ठेवून विकास केला तर नक्कीच प्रगती घडतं असते हे धोरण तंतोतंत पाळणारे पृथ्वीराज बाबा एकमेव राजकारणी असावेत. यावेळी अजितराव पाटील, गजानन आवळकर यांनी मनोगत व्यक्त केले तर बी.जी. काळे सर यांनी आभार मानले.  

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 262 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket